राष्ट्रवादीचे नेते आमदार राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर

Rajesh Tope

मुंबई: अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा असून आता टोपे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीची गळती थांबण्याचे नाव घेत नाही.

घनसांवगी विधानसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना 24 हजार मतांचे लीड मिळाल्यामुळे राजेश टोपे यांची चांगलीच गोची झाली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे. तीन वेळा आमदार राहिलेले आमदार राजेश टोपे यांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण ज्याण्याशी भीती वाटत आहे. घनसावंगी हा मतदार संघ सेनेकडे असल्यामुळे टोपे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत एनडीला मिळालेल्या मोठ्या विजयामुळे राज्यात शिवसेना-भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला आहे. तर विरोधी पक्षाची झोप उडाली आहे. त्यात जालन्यातील घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार टोपे यांचीही तशीच अवस्था झाली आहे.