शरद पवारांचे निकटवर्तीय आमदार भालके यांचे निधन ;राष्ट्रवादीवर शोककळा

Bharat Bhalke

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले ते ६० वर्षांचे होते. भारत भालके यांनी पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या विषाणूवर मात करत ते बरेही झाले होते. पण कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

शरद पवार स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात राहून आमदार भालकेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि भालके यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान भालके हे पंढरपूर मंगळवेढा इथून निवडून आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर संसर्गामुळे त्रास होत असल्याने त्यांना पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ‘पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याची आणि प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER