राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडींना वेग ; अजित पवारांसह बडे नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Today

मुंबई :- परमबीर सिंह (Parambir singh) यांच्या पत्रातील आरोपासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हालचालींना वेग आला आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार आणि अनिल देशमुख स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील, अशी माहिती समोर येत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी हे महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार असल्याचे सांगितले जाते.

सिल्व्हर ओकवर काहीवेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील सिल्व्हर ओकवर दाखल होत आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होऊन सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

रम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी व्हावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे. अनिल देशमुख यांच्याकडून सीबीआय चौकशीच्या (CBI) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे .

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुख दिल्लीत; सीबीआय चौकशी टाळण्यासाठी ‘या’ बड्या वकीलाची भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button