शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावत चांगलीच ओहोटी लावली : राष्ट्रवादी नेत्याची टीका

Mahesh Tapase

मुंबई : सांगलीत ‘टप्प्यात आल्यावर’ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यक्रम केला आणि आता जळगावात (Jalgaon) शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावत भाजपाला चांगलीच ओहोटी लावल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केले.

जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP) सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या (Mayor) आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. शिवसेनेने तब्बल ४५ मतं मिळवली आहेत. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे.

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा ‘टप्प्यात कार्यक्रम’ करत राष्ट्रवादीचा महापौर केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपाचा उधळलेला वारू आता ओहोटीच्या रूपात दिसू लागला असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे महेश तपासे यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER