राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळसारखं वातावरण दिल्लीतही तयार केलं : सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar - NCP

चंद्रपूर : प्रजासत्ताकदिनी (Republic Day) दिल्लीत (Delhi) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात यावा, असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. गोळी चालली असती तर पुन्हा हेच लोक अन्नदाता शेतकऱ्यावर गोळी चालवली, अशा बोंबा मारायला मोकळे झाले असते. मात्र, केंद्र सरकारने जो संयम दाखवला त्याला मानाचा मुजरा आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी मावळमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या आणि किड्यामाकोड्यासारखे शेतकरी मरण पावले, असा गंभीर आरोप भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला.

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आलेलं हिंसक वळण हे केंद्र सरकारचं अपयश नाही. ज्या पक्षांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला २६ जानेवारी रोजी दिल्लीत प्रवेशासाठी परवानगी देण्याबाबतची भूमिका घेतली त्यांचं हे अपयश आहे. सरकारने या आंदोलनात अतिशय संयमाने भूमिका घेतली. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेन. दिल्लीत ते पुतना मावशीच्या रूपात आलेले काही षडयंत्रकारी लोक होते. या लोकांनी षडयंत्र केले. २६ जानेवारीचा दिवस निवडला. दिल्ली पोलीस, दिल्ली पोलीस आयुक्तांनी वारंवार हे आंदोलन २६ जानेवारीला करू नका, असं आवाहन केलं. तरीही आंदोलकांनी ऐकले नाही. याउलट परवानगी दिली नाही तर याद राखा, असा गंभीर इशारा दिला गेला, असं मुनगंटीवार म्हणाले.

२६ जानेवारी आमचा पवित्र राष्ट्रीय सण आहे. या राष्ट्रीय सणात विघ्न टाकण्याचं काम करण्यात आलं. आता आपण सगळ्यांनी एक संकल्प करायला हवा. जात, पंथ, धर्माच्या पलीकडे जाऊन निर्णय घ्यायला हवा. हा संविधानावर हल्ला आहे. काही लोक हा भाजपचा हल्ला होता, असं आरोप करत आहेत. तर मग ठराव करा. जो कुणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मी मोदींना याबाबत पत्र पाठवणार आहे. आपण अनेक गोष्टींना सहन करतो. देशासाठी लाखो सैनिकांनी प्राणाची आहुती दिली आहे. त्यामुळे संविधानाच्या राष्ट्रीय सणामध्ये विघ्न आणणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे. या प्रकरणातील खरे सूत्रधार बेनकाब करून त्यांना चव्हाट्यावर आणण्याचं काम अतिशय वेगानं केलं पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.

मावळमध्ये नेमकं काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मार्च २०१९ मध्ये पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अजित पवार यांनीच पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर गोळी चालवण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, अजित पवारांनी आरोप फेटाळला होता. याशिवाय “मावळच्या आंदोलक शेतकऱ्यांवर मी गोळीबाराचे आदेश दिल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन.” अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER