जेव्हा राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षा न्यायासाठी पोलीस ठाण्यात ढसाढसा रडतात

Vinaya Patil

ठाणे : मुलाला बेदम मारहाण झाली. तीन दिवस उलटून गेले तरी ठोस कारवाई होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षांना पोलिस ठाण्यात दोन तास रडत बसावे लागले. अखेर पोलिसांनी आरोपींना अटक केली. या घटनेवरून सत्ताधारी पक्षातील महिला पदाधिकाऱ्यासोबत असा प्रकार होत असेल तर सर्व सामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहितीनुसार ,
डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव परिसरात राहणारे विश्वनाथ पाटील यांचा या परिसरात राहणारे बबन पडवळ यांच्याशी काही वाद झाला. या वादानंतर बबन पडवळ आणि त्यांचा मुलगा शुभम पडवळ यांनी विश्वनाथ पाटील यांचा मुलगा प्रथम पाटील याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रथम पाटील गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस उलटून गेले तरी ठोस कारवाई झाली नाही. विश्वनाथ पाटील (Vishwanath Patil) यांची पत्नी विनया पाटील (Vinaya Patil) या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डोंबिवली महिला जिल्हा कार्याध्यक्ष पदावर आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने विनया या मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचल्या. विशेष म्हणजे विनया तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात न्यायासाठी रडत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER