
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसह दिग्गज नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे . राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भालके यांच्या निधनावर ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
पंढरीच्या विठुरायाचा वारकरी भारत नाना आज अचानक निघुन गेले ही बातमी खुप व्यथित करणारी आहे. नाना तुमच्या कडे पाहताक्षणी मुठभर मास वाढायचं. आपण अचानक EXIT घेऊन मनाला वेदना दिल्यात, असे ट्वीट करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
“पंढरीच्या विठुरायाचा वारकरी भारत नाना आज अचानक निघुन गेले ही बातमी खुप व्यथित करणारी आहे. नाना तुमच्या कडे पाहताक्षणी मुठभर मास वाढायचे . आपण अचानक EXIT घेऊन मनाला वेदना दिल्यात, असे ट्वीट करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भारत भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री. भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ifO4z8cRCl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला