शरद पवारांचा नाशिक दौरा ; मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना पोलिसांनी घरातच केले स्थानबद्ध

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाशिक येथे आगमन झाले आहे. पण या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी आणि विरोध करण्यास प्रतिबंध केला आहे.

पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना कलम 149 ची नोटीसा बजावल्या असून घरातच केलं स्थानबद्ध करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केलीय. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजरच नव्हते. त्यामुळे कोर्टाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांनी केली होती .

कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार हा दौरा करत आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. त्याचबरोबर ते दिवंगत माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वना भेट घेणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला कांदा व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. यावर आता शरद पवार तोडगा काय काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER