शरद पवारांचा अहमदनगरमधल्या 23 गावांसाठी पुढाकार, संरक्षणमंत्री राजनाथ सिहांची घेतली भेट

Rajnath Singh-Sharad Pawar

मुंबई :- सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 23 गावांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . गावकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सरसावले आहे. ही गावे आदिवासीबहुल असून त्यांची उपजीविका व सुरक्षेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली आणि प्रश्न सोडविण्याची विनंती केली. या बैठकीला सीडीएस बिपिन रावत हेही या बैठकीला उपस्थित होते.

या गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट व मेहनत करून ते जीवन जगत आहे. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू होती. मात्र आता के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप सध्या नाकारण्यात आले आहे . तसेच शूटिंगच्या सरावामध्ये येथील खारेकर्जुन गावातील अनेक स्थानिकांना आपला जीव गमवावा लागल्याचेही समोर आले आहे. गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये धास्ती निर्माण होऊ लागली आहे. हे सर्व प्रश्न संरक्षणमंत्र्यांसमोर मांडून स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घेण्याची तसेच के के रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची मागणी शरद पवारांनी केली.

संरक्षणमंत्र्यांनी के के रेंजसाठी अधिक भूसंपादन होणार नाही असे आश्वासनही दिले आहेत. सरावासाठी ही जमीन वापरण्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक अधिकारी यांच्याशी स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी अर्थमंत्र्यांशी बोलून वित्तीय संस्थांची बैठक बोलवण्यात येईल, कर्जाअभावी कोणाचीही विकास थांबू नये, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER