गाडीतील सॅनिटायझरने पेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याचा होरपळून मृत्यू

Sanjay Shinde.jpg

मुंबई : आग्रा महामार्गावर गाडीला भीषण आग (Fire) लागल्याने राष्ट्रवादीचे (NCP) नेते संजय शिंदे (Sanjay Shinde) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, शिंदे यांनी गाडीत शॉटसर्किट झाल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र त्यांना दरवाजा उघडता आला नाही. मुख्य हवालदार असणाऱ्या एकनाथ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने पेट घेतल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. मात्र कोणालाही गाडीत आडकलेल्या व्यक्तीची मदत करता आली नाही. काही काळात घटनास्थळी अग्नीशामन दलाची गाडी पोहचली आणि आग विझवली मात्र तोपर्यंत शिंदे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी शिंदे यांच्याकडे होती. साकोरे गावच्या उपसरपंचपदी त्यांच्या पत्नी निर्मला शिंदे यांची दोन महिन्यापुर्वी निवड झाली होती. गावात विकासकामाचा संकल्प त्यांनी अनेकदा बोलुन दाखविला होता. एक चांगला नेता हरपल्याची हळहळ गावतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिंदे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER