… की आता मुंबई, महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आली? रोहित पवार

Rohit pawar

मुंबई :- उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतले होते. उत्तर प्रदेशातील एकूण घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका केली. तसंच मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर गप्प का? असा सवालही त्यांनी केला.

“उत्तर प्रदेशात माध्यमांना रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही? आणखी किती दिवस गप्प बसणार? की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे?,” असे सवाल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नाव न घेता कंगनालाही टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER