अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत गटबाजीचे संकेत

दादांच्या समर्थकांचे राजीनामे

Ajit Pawar

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र आता अजितदादांच्या समर्थकांनीही राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

ही बातमी पण वाचा:- अजित पवारांनी कुटुंबातील अंतर्गत कलहामुळे राजीनामा दिला असावा…

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवक जावेद शेख यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. त्यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या सूडाच्या राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं शेख म्हंटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचं सांगण्यात येतं. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच पक्षातील कोणत्याही नेत्याला त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं. शिवाय पक्षांतर्गत कुरबुरींमुळेही त्यांनी राजीनामा दिला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिखर बँक घोटाळ्यातही अजित पवार यांचं नाव आल्यानेही त्यांनी राजीनामा दिला असावा असंही सांगण्यात येतं.