विजयसिंह मोहिते-पाटील यांचे राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी राजकारण सुरु

Vijay Singh Mohite-Patil-Rajesh tope

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजपात प्रवेश केला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सध्या थेट भाजपात प्रवेश केलेला नसला, तरी त्यांच्या संपर्कातूनच सध्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप-सेनेचा मार्ग पत्करला आहे. अद्यापही मोहिते -पाटील यांचे राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी राजकारण सुरु आहे.

ही बातमी पण वाचा : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय जवानांनेही चौकी उडवली

मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दर्शनाच्या निमित्ताने येथे येत बंद खोलीत चर्चा केल्याने अनेक प्रकारचे तर्क-वितर्क काढण्यात येत आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील हे आज अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आले होते. याचवेळी माजी मंत्री राजेश टोपे हे देखील सपत्नीक दर्शनासाठी आले होते. यावेळी मोहिते-पाटील व टोपे यांच्यात देवस्थानाच्या कार्यालयात बंद खोलीत चर्चा झाली. त्या वेळी अन्य व्यक्ती उपस्थित नव्हती.

ही बातमी पण वाचा:- दबावशाही आणि झुंडशाही हे तर शिवसेनेचं वैशिष्ट्यच – विद्याताई चव्हाण

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच मोहिते-पाटील घराण्याचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत खटके उडत होते. त्यामुळे ते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : सोलापुरात राष्ट्रवादीला धक्का, आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत