एकनाथ खडसेंना भाजपमध्ये पश्चाताप झाल्याने ते राष्ट्रवादीत आले; राष्ट्रवादीचा टोला

Prajakt Tanpure & Ram Shinde

नगर : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला . यानंतर भाजप (BJP) नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप – प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत . ‘खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्ये जी किंमत होती, ती कधीही राष्ट्रवादीत मिळणार नाही. आगामी काळात खडसे यांना राष्ट्रवादीत गेल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा घणाघात माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी केला होता. यावरून राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते आज नगरमध्ये बोलत होते.

भाजपमध्येच खूप पश्चाताप झाला, म्हणूनच ते आमच्याकडे आले, असा टोला राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना लगावला आहे. आमच्या पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवला जातो, हे त्यांना लवकरच कळेल, असेही तनपुरे म्हणाले.

दरम्यान खडसे यांच्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील कोणी मोठा नेता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे का? असे तनपुरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘तसं पाहिलं तर मी पक्षात छोटा कार्यकर्ता आहे. मात्र नगरमधील काहीजण संपर्कात आहेत. वेळ आल्यावर आपल्याला कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER