राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला

Parth Pawar - Harshvardhan Patil

इंदापूर : भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात. मात्र अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची भेट घेतली.हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली असल्याची माहिती आहे .

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे निधन झाले. 18 मार्च 2021 रोजी अल्पशा आजाराने अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली. या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.

पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता. लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही, असा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button