भाजपला मोठी गळती ; अनेक आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महाविकास आघाडी सरकार (MVA Govt)स्थापन केले . मात्र हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे आरोप वारंवार विरोधकांकडून करण्यात येत आहेत . मात्र सध्या काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपचेच काही आमदार संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

मात्र सध्या काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपचेच काही आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.

भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) जाहीर करतील, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे .

नवाब मलिक (Nawab malik)अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, येत्या चार महिन्यात आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले अनेक जण राजीनामा देऊन परत आमच्याकडे येतात की नाही हेच बघा, असे म्हटले होते .

ही बातमी पण वाचा : भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच, भुजबळांच्या दाव्याने खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER