कोरोनाग्रस्त आजीला राष्ट्रवादीच्या नेत्याने दिला धीर ; पीपीई किट घालून रुग्णालयात

Jayant Patil

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला आज भेट दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट (PPE kit) घालून रुग्णांची भेट घेतली.

‘आता कसं वाटतंय आजी …. काही काळजी करू नका… दोन-तीन दिवसात बर्‍या व्हाल…’ अशी विचारपूस करत जयंत पाटील यांनी एका ९० वर्षांच्या आजीला धीर दिला. या आजीला कोरोनाची लागण झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आमच्या सांगली जिल्ह्याची परिस्थितीही काही वेगळी नाही. जिल्ह्यातील माझी माणसं कोरोनाशी दोन हात करत आहेत, असं पाटील यांनी सांगितलं.

जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. लवकरच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू. इथला प्रत्येक रुग्ण या रोगावर मात करणार व माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER