लावालावी करू नका; जयंत पाटलांनी विरोधकांना सुनावले

Jayant Patil

अमरावती : राज्यातील आघाडी सरकारने आपला एक वर्षाचा कार्यकाळ उत्तमपणे पूर्ण केला आहे. आमचा कारभार सुरळीत सुरू आहे. आम्ही तिन्ही पक्ष आनंदाने कारभार करत आहोत. त्यामुळे ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका; अशा शब्दात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने अमरावतीत आले आहेत. आज संध्याकाळी राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने त्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विरोधकांना फटाकरले आहे.

‘महाविकास आघाडी सरकारमधील आम्ही तिन्ही आनंदाने राज्यकारभार चालवत आहोत. ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावलावी करणाऱ्यांनी हे उद्योग करणे बंद करावेत, अशा शब्दात पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वारंवार पाठिंबा दिलेला आहे. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर गेले होते. आज देशातील सर्व शेतकऱ्यांची सहानुभूती दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. मात्र हे आंदोलन बदनाम करण्याचं डाव आज भाजप आखत आहे. तसं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे घडलं ते पुढे करून शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचं जनमत केलं जात आहे. आंदोलनांना बदनाम करण्याची भाजपची ही जुनीच खेळी आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER