चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक;हसन मुश्रीफ यांचा टोला

Chandrakant Patil AND hasan-mushrif

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे . मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले, तरी त्यांची माया कुठं आहे हे मला माहिती आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button