राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे . ईडीने (ED)(एकनाथ खडसे यांच्या विरोधात मनी लॉनडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी खडसे यांनी ही याचिका केली आहे, या याचिकेवर आता पर्यंत तीन वेळा सुनावणी झाली आहे. पुणे येथील एमआयडीसी लँड घोटाळाच्या अनुषंगाने ईडीने हा गुन्हा दाखल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या व्यवहारामुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद त्यागावे लागले होते.

यानंतरच्या काळात एकनाथ खडसेंना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे व नाशिकच्या प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा ४० कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे.

या जमीन खरेदी प्रकारणामुळेच एकनाथ खडसे यांना ईडीशी सामना करावा लागत आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या उच्च न्यायालयातील याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसचं या चौकशीची व्हिडिओग्राफ करण्याची मागणी या याचिकेत आहे. तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे . आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER