
जळगाव :- भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असल्याने या दरम्यान बोलणे योग्य ठरणार नाही. आपल्याकडे याविषयीची कागदपत्रे, पत्रव्यवहार असून दोन दिवसांत ही सर्व माहिती पत्रकार परिषद घेऊन देतो, अशी माहिती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एका वृत्तपत्राला बोलताना दिली.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री यांची पण माहिती असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले. दरम्यान एकनाथ खडसे हे याविषयी तक्रार करून ते कोणती खेळी खेळत आहेत?
बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे व पुणे येथे दाखल गुन्ह्यासंदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, याविषयी आपण राज्य सरकारकडे २०१८पासूनच १५ ते १६ तक्रारी केल्या आहेत. सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवरदेखील दिल्ली येथे व ऍड. कीर्ती पाटील यांनीदेखील तक्रारी केल्याचे खडसे यांनी सांगितले.
ही बातमी पण वाचा : मग शरद पवारांना आम्ही ‘शप’ म्हणायचं का?- चंद्रकांत पाटील
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला