‘जवळचं’ आणि ‘लांबच’ दिसण्यासाठी ‘सेन्स’ असावा लागतो ; रोहिणी खडसेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडीचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केलेल्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विटवरवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहिणी खडसे यांच्या हातात कॅमेरा दिसत आहे.

कॅमेरा सोबत “लेन्स” आणि माणसाकडे “सेन्स” असणं खूप गरजेच असत. “जवळच” व “लांबच” नीट समजण्यासाठी !!, असे रोहिणी खडसे यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे रोहिणी खडसे यांच्या या कॅप्शनचा नेमका अर्थ काय यावरुन सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button