मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये; धनंजय मुंडेंकडून फोनवरुन पंकजांच्या तब्येतीची विचारपूस

Dhananjay Munde - Pankaja Munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjayy Munde) यांनी मंगळवारी त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. या आजारात होणारा त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिल्यची माहिती आहे .

पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा (Coronavirus) त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, असे ट्विट धंनजय मुंडे यांनी केले आहे .

कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER