मुंबई पालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे वाद ; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या भूमिकेवर नाराज

Congress-NCP-Shivsena

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा गाजत असतानाच आता आणखी एका मुद्दावरून राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते शिवसेनेच्या (Shivsena) भूमिकेवर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . मुंबईचे आयुक्त इकबाल चहल (Mumbai Commissioner Iqbal Chahal) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहे .

इकबाल चहल आणि शिवसेना यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची नाराज असल्याची माहितीसमोर आली आहे. मुंबईसाठी नियोजन करणार्‍या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावे , अशी चहल यांनी भूमिका मांडली आहे. शिवसेनेने सुद्धा हीच भूमिका मांडली आहे.
मुंबई महापालिकेचे बजेट सादर करताना महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी एका प्राधिकरणाच्या प्रस्ताव दिल्याचे नमूद केले आहे. मुंबईत म्हाडा, SRA, MMRDA अशी विविध नियोजन प्राधिकरणे आहेत. या प्राधिकरणाची जबाबदारी देखील विविध पक्षात वाटून दिली आहे.

असे असताना महाविकास आघाडी सरकारला विचारात न घेता आयुक्तांनी कोणाच्या सांगण्यावरून प्रस्ताव दिला, असा सवाल आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी विचारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER