‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’ राष्ट्रवादीची भाजपच्या आंदोलनावर टीका

ncp leader Amol Mitkari on bjp maharashtra bachav andolan

मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण दर दिवसाला मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे भाजपाने म्हटले आहे. यासाठी भाजपा आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे.

या आंदोलनावर सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

ही बातमी पण वाचा:- भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?;जनतेने विचार करावा – जयंत पाटील

“महाराष्ट्र पाण्यात बुडत असताना ज्यांनी शांतपणे पाहिला, संकटकाळातील निधी ज्यांनी दिल्लीला पाठवला, शेतकरी आत्महत्येचा आलेख ज्यांनी चढता ठेवला ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा! असे मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, राजकुमार यांचा एक गाजलेला डायलॉग ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’, असाही उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये कतेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला