कावळ्याच्या शापाने… अजित पवारांनी निलेश राणेंना फटकारले

Ajit Pawar-Nilesh Rane

पुणे :- भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे हे सतत महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते; पण ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) निलेश राणेंना (Nilesh Rane) टोला लगावला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. काही निलेश राणे यांनी ट्विट  करून ‘अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत. पण कसं तरी उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं; पण आता दोन  उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे, अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’ असा टोला निलेश राणेंनी लगावला होता.

आता अजित पवार यांनी आपल्या शैलीत निलेश राणेंना चांगलाच टोला लगावला. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठे करायचे’ असे म्हणत अजित पवार यांनी निलेश राणे यांचे नाव न घेता सणसणीत टोला लगावला.

तसंच, राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्म्युला  आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल नाही, असे पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे सरकारला शोभतं का? – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER