आता डोंगरीतील इमारतही खेकड्यांनी पाडली का ? अजित पवारांचा सरकारला टोला

Ajit Pawar

मुंबई : डोगरी येथे केसरबाई इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांता मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा :- एका आमदाराच्या जाण्याने पक्ष संपणार नाही – अजित पवार

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा दावा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. हाच धागा पकडत मुंबईतल्या डोंगरीतील इमारत खेकड्यांनी पाडली, असे सरकारने जाहीर करून टाकावे, असा टोला त्यांनी लगावला आहे. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. लोकांचे जीव जात असताना हे सरकार कठोर निर्णय घेत नाही. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटल्याचे राज्य सरकारचे मंत्री सांगतात . धरण केवढे, खेकड्यांचा जीव केवढा, किती खोटे बोलावे, अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे . दरम्यान लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आता विधानसभेसाठी आम्ही तयारीला लागलो असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

ही बातमी पण वाचा :- पराभवामुळे पार्थ ”खचला” नाही – अजित पवार

दरम्यान मालाड येथील भिंत कोसळून अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी कोसळला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली तब्बल ५० जण अडकल्याची माहिती समोर आली होती. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल होऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले होते.