“सर्वच परीक्षा पुढे ढकला”, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

Jitendra Awhad - Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे . याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसंच अभ्यासावर होत असून अनेकजण परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यामध्ये एमपीएससीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांकडे (CM Thackeray) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो.

जितेंद्र आव्हाड यांनी हॅशटॅगमध्ये एमपीएससी परीक्षेचाही उल्लेख आहे. याआधी जेव्हा राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यामुळे राज्य सरकारने लगेचच परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. दरम्यान ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button