
मुंबई :- प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. भाजपला (BJP) पराभूत करणे हे आमचे ध्येय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) ही आघाडी निर्माण केली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येत्या २८ जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे १४ जिल्हे आणि ४२ मतदारसंघांचा आढावा घेऊ, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही पाटील यांनी केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अभिप्राय अभियान राबवून डिजिटल मोहीम सुरू केली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ही बातमी पण वाचा : जयंत पाटील यांचे पक्षासाठीचे कष्ट फळाला येणार! लवकरच राज्यव्यापी दौ-यावर
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला