‘धनंजय मुंडेंच्या प्रकरणात आमचा हस्तक्षेप नाही’, राष्ट्रवादीची पहिली अधिकृत प्रतिक्रिया

Dhanajay Munde-Jayant patil

मुंबई :   राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. तसंच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यामुळे अटक केली आहे.

या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ‘आम्ही कोणीही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात आमचा हस्तक्षेप नाही. त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, हे भाजपचं काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील.’ असं जयंत पाटील (Jayant patil) म्हणाले.

‘नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही, पण सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी नि:पक्ष चौकशी करावी. जावयानं  काय केलं, त्याचं खापर सासऱ्यावर का फोडता?’ असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित करत मलिक यांच्या मंत्रिपदावर शंका उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र सरकार दबावाचं राजकारण करत आहे, हे जगजाहीर आहे. देशाच्या जनतेला हे सगळं कळत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसंच पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी, मला माहिती नाही, असं उत्तर दिलं.

ही बातमी पण वाचा : राजकारण्यांनी भान ठेवावं, शरद पवार हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER