माझ्या पत्नीने ‘संघा’त कधी प्रवेश केला याच उत्तर मागणार – जयंत पाटील

Jaynt Patil-RSS.jpg

मुंबई : राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे नाव असलेली एक कथित पोस्ट सध्या सोशल मीडियात चांगलीच वायरल झाली आहे. या पोस्टमधील फोटोत काही स्त्रीया स्वयंपाक करतांना दिसून येत आहेत. पूर ग्रस्तांसाठी स्वयंपाक बनवताना संघ स्वयंसेवक असे या फोटोवर लिहिले आहे. या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

संघाच्या त्या फोटोत माझी पत्नी दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या पत्नीने संघात कधी प्रवेश केला, हे मी घरी जाऊन विचारणार आहे. संघाने अशा प्रकारे फोटो वापरून पोस्ट करणे चुकीचे आहे. काम करत असताना अशा प्रकारच्या घटना घडत असतात; त्यामुळे इतक्या बारीक गोष्टीसाठी गुन्हा दाखल करणे मला योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.