फडणवीस यांच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना डोक्यावर घेतले आहे – प्रसाद लाड यांचा टोमणा

Prasad Lad-Eknath Khadse-Devendra Fadnavis

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर घेतले आहे, अशी टीका भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी केली.

एकनाथ खडसे यांच्या राजकीय तकदीबद्दल खूप फुगवून सांगितले जाते आहे असे सूचित करताना लाड म्हणाले, खडसे यांच्यात इतकी ताकद होती तर मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत?

खडसेंचा उलट प्रवास सुरु

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले – भाजपा सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू. आम्हाला काही फरक पडणार नाही. ,

शरद पवार गेल्या ४० वर्षांपासून राजकीय दौरे करत आहेत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात दौरा केला तरी भाजपाला काही फरक पडणार नाही.उत्तर महाराष्ट्रात कोणी किती दौरे केले तरी भाजपाचे काहीही नुकसान होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपाला मानणारा एक वर्ग आहे. त्याठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असे प्रसाद लाड म्हणालेत.

शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात जाणार आहेत.

ही बातमी पण वाचा : खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पवार खान्देशात पक्ष विस्तार मोहिमेवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER