राष्ट्रवादीचं मिशन मुंबई : महापालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीसह उतरणार

BMC-Sharad Pawar

मुंबई : २०२२च्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपपाठोपाठ शिवसेनेतही महापालिका निवडणुकीसंदर्भात खलबतं सुरु झाली आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेत फारसं यश न मिळालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पूर्ण ताकदीसह आगामी निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, कोरोनाचे संकट नियंत्रणात येताच पक्षबांधणीसाठी मुंबईत राष्ट्रवादीचे (NCP) मोठे मेळावे घेतले जातील. तसेच वॉर्डनिहाय पक्षबांधणी मजबूत करण्याचे काम सुरु आहे. युवक आणि महिलांचे गट मजबूत करण्याचं काम सुरु आहे.

नवाब मलिक म्हणाले की, राज्याप्रमाणे मुंबई महापालिकेतही महाविकास आघडीने एकत्रित निवडणूक लढवायला हवी, अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस स्वबळावर लढू असं म्हणत असली तरी अजून १५ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे निवडणुकीत बरेच बदल होऊ शकतील. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राष्ट्रवादीचं मुंबईकडे दूर्लक्ष झालं आहे आणि ही बाब मान्य करायला हवी. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मुंबईतही आक्रमक होणार आहे. मुंबईतील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेले. परंतु आता मुंबईत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाची ओळख असणारे नेतेही लक्ष घालणार असल्याचे म्हणत मलिक यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER