राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण…- जयंत पाटील

Jayant Patil-Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. पण तरीही आपण पक्ष वाढविण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असतात. अशा लोकांना पक्षात येण्यास प्रोत्साहित करा, पक्षाची बूथ कमिटी मजबूत करा आणि संपर्क वाढवा , असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर संघर्ष करा. संघर्षाशिवाय गत्यंतर नाही. या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला, तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल , असा विश्वासही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान आम्हाला हक्काचे आणि अधिकृत घर हवे, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरातील असंख्य महिलांनी पाटील यांची भेट घेतली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER