मुंबई महापालिका निवडणूक; राष्ट्रवादी देणार शिवसेनेला धक्का?

मुंबई :- राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक आज गुरूवारी झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक म्हणाले, मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू!

मुंबई महापालिकेच्या २२७ वार्डांमध्ये राष्ट्रवादी तयारी करीत आहे. वार्डनिहाय पक्ष संघटना बांधण्यावर आमचा जोर आहे, असे नवाब मलिक म्हणाले. सध्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून, राज्यातील महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी घटक पक्ष आहे, हे येथे उल्लेखनीय. माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले, १ मार्चला चुनाभट्टी येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल मार्गदर्शन करतील. मुंबई पालिका निवडणुकीचे रणशिांग येथून फुंकले जाईल, असे मलिक म्हणाले.