आगामी काळात राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे? पवारांनी दिली या नावांना पसंती

Sharad Pawar

मुंबई :- आगामी काळात शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीची (NCP) सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपविली पाहिजेत, अशी अनेकदा चर्चा होते. पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच पक्षाची सूत्रे सोपवली जातील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र याबाबत लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रश्न विचारला असता पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही नावांचा उल्लेख करत संभ्रम वाढवला आहे.  “राष्ट्रवादीमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे.

या सगळ्यातून मान्य असेल असे अनेक लोक राष्ट्रवादीमध्ये मी सांगू शकतो. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अशी  नावे  मी घेऊ शकतो. आज या पक्षामध्ये असे अनेक लोक नेतृत्व करण्याच्या कुवतीचे आहेत.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संभ्रम वाढवला आहे. शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर विजय दर्डा यांनी मुलाखत घेतली. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे बघता का? असा प्रश्न विजय दर्डा यांनी शरद पवार यांना केला. यावर शरद पवार म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही.

त्यांचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये आहे, पार्लमेंटमध्ये आहे. त्यांना सर्वोत्तम संसदपटूचे पुरस्कारही मिळाले आहेत. ‘लोकमत’चा पुरस्कारही मिळाला आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट त्यांचा तिथे आहे.” कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत लगावला होता.

यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र, सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यात नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे, असं स्पष्ट करत शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील, पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER