राष्ट्रवादी जोरदार इन्कमिंक ; शिवसेना नेते क्षीरसागर यांना धक्का देत शाहेद पटेलांसह १०१ कार्यकर्त्यांच्या हाती राष्ट्रवादीचा झेंडा

Maharashtra Today

बीड : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे . शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांना धक्का देत पटेल फाउंडेशनचे शाहेद पटेल (Shahid Patel) राष्ट्रवादीत दाखल झाल्याची माहिती आहे . त्याच्यासोबतच 01 प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. राष्ट्रवादीत होणाऱ्या जोरदार इन्कमिंकमुळे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पारडे जड झाले आहे .

आमदाक संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शाहेद पटेल यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पटेल फाऊंडेशन हे सामाजिक संघटन आहे. संचालक शाहेद पटेल यांचं बलाबल मोठं आहे. पटेल फाऊंडेशनचे जिल्ह्यात मोठे नेटवर्क आहे. अनेक ग्राम पंचायत सदस्य देखील पटेल यांच्याकडे आहेत. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून शाहेद पटेल यांची जिल्ह्यात ओळख होती. मात्र अचानक जयदत्त क्षीरसागर यांना पटेलांनी सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER