गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तालुक्यांत राष्ट्रवादीचा झेंडा

Anil Deshmukh

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या गटाने काटोल तालुक्यातील तीनही ग्रामपंचायतींवर तर नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला.

काटोल तालुक्यातील भोरगडमध्ये सर्व ९, खंडाळा ग्रामपंचायतमध्ये सर्व ७ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगावमध्ये ९ पैकी ८ राष्ट्रवादी व शेकापचा एक  उमेदवार विजयी झाला. नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने नरखेड तालुक्यातील सर्वांत मोठ्या जलालखेडा ग्रामपंचायतमध्ये १३ पैकी १० जागांवर, थडपवनी येथे ९ पैकी ९ जागांवर, महेंद्री येथे ७ पैकी ६, खैरगाव १३ पैकी १०, सिंजर येथे ७ पैकी ५, अंबाडा येथे ९ पैकी ७, सायवाडा येथे ९ पैकी ६ राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER