एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या(Sharad Pawar) भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत .

दरम्यान याअगोदर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button