‘त्या’ वक्तव्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : “सुशांत जिवंत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे.” असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन (Majid Memon) यांनी केले आहे. यावर आता  राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) स्पष्टीकरण देत त्यांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसून त्यांचे वैयक्तिक मत होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिले आहे.

“मजिद मेमन यांनी केलेले वक्तव्य हे राष्ट्रवादीचे नव्हे तर त्यांचं वैयक्तिक मत आहे. आमचा पक्ष कोणत्याही स्वरूपाने किंवा पद्धतीने त्यांच्या विधानास पाठिंबा देत नाही किंवा समर्थन देत नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.” असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. यासंदर्भात एक ट्विट मलिक यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER