तीन कोटी सोडा, मी एक रुपयाही खर्च केलेला नाही – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई :- राज्यावर एकीकडे कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. तर दुसरीकडे मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक बंगल्यांचा समावेश आहे. सामाजित न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही यात उल्लेख आहे.

दरम्यान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत फेटाळलं आहे. तीन कोटी सोडा, मी एक रुपयाही खर्च केलेला नाही, असं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे. त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे. मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ आठ  दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER