शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का : राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचे कट्टर समर्थक शिवसेनेत

NCP corporetoers joins shivsena

बीड :- ज्या नगरपालिकेच्या रणभूमीवर काकांविरुद्ध रणशिंग फुंकून त्यांना जेरीस आणले, आता त्याच रणभूमीतून एकेक शिलेदार काकांच्या तंबूत परतत आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या काकू-नाना आघाडीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुतण्या संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त आणि डाॅ. भारतभूषण क्षीरसगार यांच्याकडून हा दुसरा हादरा बसला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या विषय समिती सभापती निवडीतही काकू-नाना आघाडीने शस्त्र म्यान केल्याने काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर गटाने सर्व समित्यांवर एकतर्फी झेंडा फडकविला. सत्तेतली आमदारकी मिळाल्यानंतरही संदीप क्षीरसागर समर्थकांत नाराजांची संख्या हळूहळू वाढतच जाण्याचे कारण काय, याची चिकित्सा आणि त्यावर उपाय योजना होताना दिसत नाही. त्यामुळे शुक्रवारी सीता भैयासाहेब मोरे, गणेश तांदळे यांच्या आई कांताबाई तांदळे, प्रभाकर पोपळे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सभापती दिनकर कदम, विलास बडगे, नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, गुंजाळ आदींची उपस्थिती होती.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण…- जयंत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER