शिवसेनेला राष्ट्रवादीची मदत, माजी महापौरांनी केला गौप्यस्फोट

Shivsena & NCP

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेचा (Shivsena) महापौर असला तरी महापौर पदावर बसण्यासाठी आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी मदत केली. मला महापौर होण्यासाठी पाच नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज होती. अशा वेळी सतीश चव्हाण यांनी मला पाच नगरसेवकांची मते दिले. त्यामुळेच मी महापौर झालो, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले (Nandkumar Ghodele) यांनी केला. आमदार सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सतीश चव्हाण यांचा विजय महाविकास आघाडीचा विजय असून शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा प्रचार केला. औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता असतानाच सतीश चव्हाण यांनी आपल्याला महापौर होण्यासाठी मदत केली. शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आमदार सतीश चव्हाण कायम पुढाकार घेत असून त्यांच्या प्रयत्नातून अनेक कामे मार्गी लागली असल्याचं घोडेले यांनी नमूद केले.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक होते. असे असताना महापौर घोडेले पाच नगरसेवक मी दिल्याचे सांगत आहे. हा पाचवा नगरसेवक कोणता? हा प्रश्न मलाच पडला असल्याचे सतीश चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हटले.

ही बातमी पण वाचा : मुनगंटीवारांकडून आदित्य ठाकरेंचे भरभरून कौतुक; ‘आदित्य म्हणजे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारा, वाघाचं हृदय असलेला खरा नातू’ 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER