शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सपष्टीकरण

Sharad Pawar - NCP

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) युपीएचे (UPA) नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद सोपवले जाणार असल्याचे सांगितले जात होते . या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचे सांगत वृत्त फेटाळले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचे म्हटले आहे. युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे, असे महेश तपासे यांनी म्हटले आहे.

सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचे दिसत आहे, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

दुसरीकडे शिवेसनेने (Shiv Sena) याबद्दल बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं असे सांगत शरद पवारांमध्ये राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगितले होते.

ही बातमी पण वाचा : यूपीएच्या संभाव्य अध्यक्षपदावरून शरद पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER