राज ठाकरे यांच्या फोन कॉलवर शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar - Raj Thackeray

मुंबई : राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) भेटीनंतर मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. शरद पवार यांनीही ‘राज यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून भेटीबद्दल मात्र काहीही ठरले नाही’, असे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

या भेटीत राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले .राज ठाकरे यांनीही राज्यपालांच्या शब्दाला मान देत शरद पवारांशी फोनवर चर्चा केली. राज यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी खुलासा केला आहे. राज यांचा मला फोन आला होता.

आमच्यात भेटण्याबद्दल काही ठरले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. त्यामुळे भेटीचे  असे काही नियोजन ठरले नाही. मला फक्त राज ठाकरे यांनी सांगितले की, मला राज्यपालांनी तुमच्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे, असे शरद पवारांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER