शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी ; सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार फोटोही केला शेयर

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar Health Update) यांच्यावरील शस्त्रक्रिया अखेर यशस्वीरित्या पार पडली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन (glad-badder-endoscopy-surgery)बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.

शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच इतर काही लोक उपस्थित होते. रात्री उशिरा शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबत अधिकृतरित्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

सुप्रिया सुळे यांनी देखील रात्री उशिरा ब्रीच कॅंडीमधील ज्या डॉक्टरांनी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली त्यांच्यासमवेत एक फोटो शेअर केला आहे आणि आभार मानले आहेत.

दरम्यान शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button