पुण्यात कोरोनाबाबत रणनीती कुठं चुकतेय?; शरद पवार स्वत : मैदानात

आजही बैठकांचा सपाटा

Sharad Pawar

पुणे : पुण्यात (Pune) कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: मैदानात उतरले आहेत. पवार आज शनिवारी तिसऱ्या दिवशीही पुण्यात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पवार पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आाढावा घेत आहेत. कोरोनाबाबत रणनीती कुठं चुकतेय? काय केलं पाहिजे? यावर शरद पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आजही शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी, डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण बैठका बोलवल्या आहेत. सकाळी 11 नंतर एकूण 4 बैठका होणार आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि प्रकाश जावडेकर वृत्तपत्रांच्या संपादकांसोबतही चर्चा करणार आहेत. नंतर 4.30 वाजता प्रकाश जावडेकर हे पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहिती समोर येत आहे .

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता तब्बल 800 बेडची जम्बो कोविड रुग्णालये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत सुरू करण्यात आली होती. पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांच्या मृत्यूनंतर जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी आणि सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यावर शरद पवार याणी नाराजी व्यक्त केली होती . पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा याबाबतही शरद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेत त्यांची चांगलेच फटकारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER