बाळासाहेबांची दिवसातून एकदा तरी आठवण येते- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने शिवतीर्थावर मोठी गर्दी होत आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दाखल झाले. छगन भुजबळ ही एकेकाळी शिवसैनिक होते.

शिवसेनेत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यानंतर शिवसेना सोडून ते राष्ट्रवादीत गेले. पण, आज पुन्हा स्मृतिदिनाच्या निमित्ताने छगन भुजबळ शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते.

स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेबांनी उभा केला : शरद पवार

बाळासाहेबांसोबत मी २५ वर्षे कार्यरत होतो. शिवसेनेचे चढ-उतार, लढाई होत्या त्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होत होतो. त्या सर्वांचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे, दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. आणि बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं.