‘त्या दिवशी राजीनामा देण्याची काही गरज नव्हती’; भुजबळांची अजित पवारांवर बोचरी टीका

Ajit Pawar and chhagan-bhujbal

नाशिक :- विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाला काही दिवसाचं शिल्लक असतांना राष्ट्रवादी काँगेसमधील दोन मोठ्या नेत्यांमध्ये जुंपली असल्याचं चित्र सध्या दिसू लागलेलं आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते, त्यादिवशी पक्षाच्या बाजून इतकं चांगल वातावरण निर्माण झालं होते. दोन दिवस तरी मीडिया व्यापला असता. पण संध्याकाळ होत आली, वातावरण झटकन बदललं आणि फोकस बदलला. राजीनाम्याचं कारण नव्हतं, निदान त्या दिवशी तरी द्यायला नको होता. अजित पवार यांनी दोन दिवस भावना आवरायला हव्या होत्या असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मी बांगड्या घातलेल्या नाही, कोणी दम दिला तर त्याच्या खानदानाला बघतो’ – अजित पवार

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर शरद पवारांनी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल सांगत ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय स्थगित केला होता. त्यादिवशी सरकारविरोधात वातावरण पेटलं असताना अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने सगळा फोकसच बदलला असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“याच्यात पक्षाचा काय फायदा झाला, काय नुकसान झालं हे त्याचं त्याने ठरवावं,” “अजित पवार भावनाप्रधान अमुक, तमुक आहेत वैगेरे सगळं मान्य…पण दोन दिवस भावना आवरल्या असत्या तर बरं झालं असतं,” असा टोलाही त्यांनी मारला.

ही बातमी पण वाचा : हे पार्सल कुठेही पाठवा, मुंबईत पाठवू नका : उद्धव ठाकरेंची भुजबळांवर टीका