शरद पवारांनी दिली वाझे प्रकरणी पहिल्यादांच प्रतिक्रिया म्हणाले…

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

शिवसेनेशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या आग्रहामुळेच सचिन वाझे यांना पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणातील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला बसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात फिरकले नाहीत. या सगळ्यामुळे शरद पवारांची डोकेदुखी वाढली आहे .

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.

काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन प्रकरणावरुन अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. हिरेन मनसुख प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन त्यांनी नापसंती दर्शविली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER